“मराठा क्रांती मोर्चा’चा राजकीय वापर होऊ देणार नाही!

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे फलक वापरण्यास बंदी

पिंपरी – देशात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी लढा देण्यासाठी स्थापन केलेला सकल मराठा क्रांती मोर्चा राजकीय भूमिकेपासून दूर राहिला आहे. तसेच, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे फलक कोणत्याही राजकीय पक्षात वापरण्यास बंदी घातल्याचा, ठराव सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याप्रसंगी, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जीवन बोऱ्हाडे, प्रविण पाटील, प्रतीक इंगळे, सतीश काळे, सागर तापकीर, धनाजी येळकर, अभिषेक म्हसे, दत्ता शिंदे, दादासाहेब पाटील आदी उपस्थित होते. बोऱ्हाडे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाला राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही.

क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ उभी केली असून मराठा समाजाची उन्नती, उत्कर्ष, मराठा आरक्षण व प्रलंबित सामाजिक मागण्या हेच उद्दिष्ट आहे. मराठा क्रांती मोर्चात कार्यरत असणारे अनेक समाज बांधव कार्यकर्ते विभिन्न राजकीय पक्ष विचारसरणीचे असल्याने व्यक्‍तिगतरित्या त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करण्यास मोकळीक आहे. परंतु, हे काम करत असताना त्यांनी मोर्चाचा वापर राजकारणासाठी करु नये. याचबरोबर, मराठा क्रांती मोर्चाने कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.