manoj jarange patil : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha reservation) मुद्दा चांगलाच गाजत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) उपोषणाला बसले होते. आता मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक ठिकाणी सभा आयोजित केल्या जातात. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेलाही एवढी गर्दी नसते, एवढी प्रचंड गर्दी जरांगे पाटील यांच्या सभांना असते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी खळबळजनक दावा केला. मराठा आरक्षणसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील राजकारण प्रवेश करतील असा दावा रोहित पवारांनी केला होता. मनोज जरांगे पाटील जानेवारीमध्ये राजकारणात येतील असंही रोहित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपली भूमिका मांडली होती.
मात्र, आता यावर स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिल आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ‘सगळ्या समाजाचं नेतृत्व करणार का?’ असं मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मी मुलगा म्हणून काम करतोय. नेता बनण्याची हवाच नाही’, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
मराठा समाजाच्या नोंदी सापडत आहेत. जर मराठा आणि कुणबी एक आहे तर तुम्ही आरक्षण देऊ नका कसं म्हणता? ते (छगन भुजबळ) आम्हाला आरक्षण मिळू देत नाही, असं ओबीसींचं म्हणणं आहे. त्यामुळे धनगर बांधवांनी का साथ द्यावी त्यांना? नुसतं विरोध करायचा म्हणून करू नये, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.