नवी दिल्ली – हृतिक रोशन आता अनेकदा त्याची गर्लफ्रेंड सबा (Hritik saba) आझादसोबत कार्यक्रमांमध्ये दिसतो. काल (दि.५) रात्री उशिराही असाच काहीसा प्रकार घडला. झोया अख्तरचा ‘द आर्चीज’चा प्रीमियर (The Archies Premiere) मुंबईत मोठ्या उत्सहात पार पडला, ज्यामध्ये संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. यावेळी हृतिक आणि सबा एकमेकांसोबत दिसून आले. यावेळी सबाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अभिनेत्री सबा काहीशा वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये दिसली, ज्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. (Hritik saba video viral)
हृतिक रोशन आणि सबा आझाद ‘द आर्चीज’च्या प्रीमियरला उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री फ्लोरल प्रिंटेड मिडी स्कर्ट आणि मॅचिंग टॉपमध्ये दिसली. यावर तिने हाय हिल्स घातल्या होत्या. ड्रेससोबतच सबाची हेअर स्टाइलही खूपच चर्चेत होती.या कार्यक्रमासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. (Saba azad new look)
सबाने यावेळी केलेली हेअरस्टाईल चांगलीच लक्षवेधी ठरली. सबाने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले आणि कपाळावर वळवून पुढे घेतले होते. यावेळी तिच्या सोबत असलेल्या ह्रितिकने ब्लॅक शर्ट आणि हॅट कॅरी केली होती. दोघांनीही यावेळी मीडियासाठी खास फोटोशूट देखील केले.
View this post on Instagram
अभिनेत्रीची ही हेअरस्टाईल पाहून लोक तिला खूप ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, असे केस करण्याच सजेशन हिला कोणी दिल असेल ?. आणखी एका यूजरने लिहिले की, जिलेबी सारखी हेअरस्टाईल. तिसर्याने लिहिले, ही खूपच क्रेझी आहे.ह्रितिक सबाच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी दोघांचं कौतुक देखील केलं आहे.