Manoj Jarange Patil On PM Modi : सरकराने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आपला आक्रमक पणा कायम ठेवला आहे. ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण घेऊन दाखवणार असा इशारा जरांगे वारंवार सरकारला देत आहेत. अशात जरांगे यांनी पंतप्रधान मोदींच नाव घेत महाराष्ट्रातील एक भाजप नेता मोदींचा करेक्ट कार्यक्रम करेल असा सूचक इशारा दिला आहे.
जरांगे सध्या गावोगाव जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधताहेत. अशात जरांगे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केलेलं एक विधान चांगलच चर्चेत आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल असं मनोज जरांगे यांनी म्हंटल आहे. | Manoj Jarange Patil On PM Modi
बीड जिल्हा दौऱ्यावर असताना जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले,”माझ्यावर एवढे जळू नका,आम्ही म्हणतोय तस आरक्षण द्या असं म्हणत जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केली. तसेच मला जातीत तोलू नका, मी फक्त मराठा आरक्षण बद्दल बोलतो असंही जरांगे यावेळी म्हणाले. | Manoj Jarange Patil On PM Modi
फडणवीसांवर टीका करताना जरांगे पुढे म्हणाले,”बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल” असा सूचक इशारा जरांगे यांनी यावेळी दिला आहे. | Manoj Jarange Patil On PM Modi