Artificial intelligence AI Airhostess Sama : गेल्या काही वर्षांत जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रेझ वाढली आहे. जगभरात विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. AI चा वापर इतका वाढला आहे की आता कंपन्या AI Human देखील तयार करत आहेत. यामुळे आता विमान सेवा देणाऱ्या कंपनीने देखील AI चा उपयोग सुरु केला आहे. एअरलाइन्सने एआय एअरहोस्टेसचा केबिन क्रूमध्ये समावेश केला आहे.
आत्तापर्यंत डिजिटल वेबसाइट्सवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. पण आता AI च्या मदतीने डिजिटल ह्युमन तयार केले जात आहेत. याचे ताजे उदाहरण तुम्हाला Qatar Airways मध्ये पाहायला मिळेल. कतारने आपल्या सरकारी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून AI Sama चा समावेश केला आहे. | Artificial intelligence AI Airhostess Sama
वेब समिटमध्ये कतारने Qatar Airways मधील AI आधारित एअर होस्टेसचा डेमो संपूर्ण जगाला दाखवला होता. कंपनीचे म्हणणे आहे की ही AI एअर होस्टेस कोणत्याही प्रकारे मानवी केबिन क्रूची जागा घेणार नाही, उलट ती अतिरिक्त वैशिष्ट्य म्हणून समाविष्ट केली गेली आहे. यानंतर कतार एअरवेज एआय एअर होस्ट्सचा समावेश करणारी जगातील पहिली एअरलाइन बनली आहे. | Artificial intelligence AI Airhostess Sama
कंपनीने दिले विशेष प्रशिक्षण
कतारने एअरलाइन्समध्ये डिजिटल मानवांची ओळख करून देऊन एआयचा एक नवीन प्रकार सादर केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान एक नवीन अनुभव मिळेल. एआय एअर होस्टेस समाला कंपनीने फ्लाइट अटेंडंट म्हणून नियुक्त करण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण दिले आहे. कंपनी आपल्या एआय एअर होस्टेसला सतत अपडेट करत असते जेणेकरून ती प्रवाशांना रिअल टाइम उत्तरे देते. | Artificial intelligence AI Airhostess Sama