Manoj Jarange Patil। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास आजपासून सुरुवात झालीय. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर बीड, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड या भागांना जरांगे पाटील भेट देणार आहेत. । Lok Sabha Election 2024
आज मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली आहे. पण मी इंचभरही मागे हटणार नाही. । Manoj Jarange Patil
मी चौकशीसाठी तयार आहे. फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल. तुमचा सगळा सुपडा साफ होईल”, असे आव्हानच फडणवीस यांना दिले.
लोकसभा निवडणुक हा माझा मार्ग नाही – । Manoj Jarange Patil
ते पुढे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुक हा माझा मार्ग नाही… पण समाजातील कुणी लढवत असेल तर मी समाजाचा मालक नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या विरोधात कोणकोण बोलतो ते आता मराठा समाज बघतो आहे.
मी आठ नऊ तारखे पर्यंत मजा बघतो मंग कामाला लागतो त्यांनी मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नये. सग्या सोयऱ्याची अमलाबजावणी करावी अन्यथा मराठ्यांशी गाठ असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
आमच्या घरावर पत्रक चिकटवायचे आहेत, तेव्हा आम्हीही सहन करणार नाही – । Manoj Jarange Patil
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात मराठा समाजाने उमेदवारी अर्ज भरावेत, असा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे का? असाही प्रश्न माध्यमांनी जरांगे यांना विचारला.
तेव्हा जरांगे म्हणाले की, मराठे काहीही करू शकतात. सरकारने तर आमचे बॅनर आणि फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहेत.
आमच्या घरावर पत्रक चिकटवायचे आहेत. तेव्हा आम्हीही सहन करणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं. । Manoj Jarange Patil