दिल्ल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली. आपने देखील सरकार सीबीआय आणि ईडीचा वापर करत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला होता. आता सिसोदिया यांनी थेट आप पक्ष तोडून भाजपात आल्यास सर्व प्रकरणे बंद करण्याची ऑफर आल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.
सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधत एक ट्विट केले आहे त्यात ते म्हणतात,”माझ्याकडं भाजपचा संदेश आला आहे – “आप” तोडून भाजपमध्ये या, सीबीआय ईडीची सर्व प्रकरणे बंद करू” तसेच पुढे ते लिहितात,”माझे भाजपला उत्तर आहे,मी महाराणा प्रतापांचा वंशज आहे. राजपूत आहे. शीर कापून देईन परंतु भ्रष्टाचाऱ्यांसमोर आणि षडयंत्र करणाऱ्यांसमोर झुकणार नाही. माझ्या विरोधातील सर्व केसेस खोट्या आहेत,जे करायचंय ते करा.” अशा आशयाचे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.
मेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे
मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लो
— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2022
सिसोदिया यांच्यामागे घोटाळ्यांचे आणि चौकशीचे प्रकरण सुरु झाल्यानंतर दिल्लीतील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील सिसोदिया यांच्या आरोपानंतर भाजपवर जोरदार टीका केली होती.