मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिची मुलगी मालती मेरीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा प्रियांका चोप्राने तिच्या मुलीचे आणखी काही न पाहिलेले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. प्रियांका आणि तिच्या मुलीचे हे फोटो इतके क्युट आहेत की सोशल मीडिया यूजर्ससोबतच अनेक सेलिब्रिटीही तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
प्रियंका चोप्राने मुलगी मालतीसोबतचे स्वतःचे दोन फोटो शेअर केले आहेत, छोटी मुलगी तिच्या आईच्या कुशीत बसलेली पाहायला मिळत आहे. प्रियांकाने मुलीचा आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रियांकाच्या चेहऱ्यावर मुलीचे छोटे पाय दिसत आहेत. मात्र, या दोन फोटोंमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे प्रियांकाच्या मुलीच्या हातात बांधलेला काळा धागा आणि पायात दिसलेली मोत्याचे पैंजण. सोनेरी आणि काळ्या मोत्यांनी बनवलेल्या या अँकलेटमध्ये हार्टच्या आकाराचे डिझाइन आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.
View this post on Instagram
या पोस्टसोबत प्रियांकाने लिहिले, “प्रेमासारखे दुसरे कोणी नाही.” अनेक सेलिब्रिटींनी यावर कमेंट केल्या आहेत. दिया मिर्झाने लिहिले, “खरे आहे.” तर प्रियांकाची चुलत बहीण परिणिती चोप्राने लिहिले, “मला तिची आठवण येते.” तसेच प्रियांकाच्या या पोस्टवर कमेंट करताना करीना कपूर खानने लिहिले. , “पीसी आणि तिच्या मुलीला बिग हग “. यासोबतच अनुष्का शर्मा, प्रीती झिंटा अशा अनेक अभिनेत्रींनी कमेंटमध्ये हार्ट पोस्ट केले आहे.