आंबा पिकवताय, सावधान

प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 

गुरूनाथ जाधव
सातारा – फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या स्वागताला जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. मात्र चुकीच्या पद्धतीने आंबा पिकवला तर कारवाई करणार असा इशाराच अन्न औषध प्रशासनाने फळविक्रेत्यांना दिला आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी फळविक्रेत्यांद्वारे आंब्यांची मोठया प्रमाणात विक्री होत असते. याच पिवळ्या धम्मक आंब्यांमध्ये काही घातक केमिकलचा सरास वापर केला जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. हे केमिकल तब्येतीसाठी हानिकारक आहे. बाजारात पाहायला मिळणारे रसरशीत आंब्यांना केमिकलने तसे बनविलेतर नाही ना. यामागील भीषण वास्तव नागरिकांनी समजुन घेणे आवश्‍यक आहे. बाजारपेठेत मिळणाऱ्या आंब्याचा रंग बदलण्यासाठी, आंबा लवकर पिकावा यासाठी केमिकल्सचा वापर सर्रास केला जातोय का? याची नागरिकांनी सजग पणे खात्री करणे आवश्‍यक आहे. एका बाटलीतून अथवा इंजेक्‍शनमध्ये भरुन एथिलीन रसायन आंब्यांमध्ये टाकलं जातं.

या रसायनामुळे तासांच्या आत आंबे पिकतात. काही ठिकाणी गोदामातले मजूर सलग या आंब्यांमध्ये हे रसायन टाकत असतात. हे रसायन टाकल्यावर आंबे धुतले जातात, आणि काही वेळ आंबे तसेच ठेवून त्यांना भरलं जातं, आंबे भरताना पेटीमध्येही कार्बाईनचे तुकडे टाकले जातात. जेणेकरुन आंबे वेगानं पिकतील. यामुळे आंब्याची मूळ चव तर जातेच पण अनेक आजारांनाही आमंत्रण मिळतं. कॅल्शियम कार्बाईड, एसिटिलीन, एथिलीन, प्रॉपलीन, इथरिल, ग्लाइकॉल आणि इथेनॉल ही रसायनं आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी वापरली जातात. आर्सेनिक आणि फॉस्फरस मानवी स्वास्थ्याला हानिकारक आहेत. आंब्यामध्ये जे रसायन टाकलंय ते आंबे आणि रसायन न टाकलेले आंबे यामधला फरकही कळणार नाही इतक्‍या बेमालूमपणे हे काम केलं जातं.

एथिलीन, प्रॉपलीन, इथरिल, ग्लाइकॉल, इथेनॉल, रसायनांमधील आर्सेनिक आणि फॉस्फरस तब्बेतीसाठी हानिकारक आहे. या केमिकलचे परिणाम म्हणून पोट खराब, आतड्यांचे गंभीर आजार, पेप्टिक अल्सर, मज्जासंस्थेसाठी घातक – डोकेदुखी, चक्कर येणं, विस्मरण, झोपण्यातल्या अडचणी असे अनेक आजार उदभवतात. तसेच गर्भवती महिलांना होणाऱ्या बाळाला आजार होऊ शकतो. असे गंभीर स्वरूपातील मानवी शरीरावर धातक परिणाम केमिकल्सने होतात. त्यामुळे सातारा जिल्हा अन्न औषध प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फळविक्रेत्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे.

यामध्ये नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन अन्न औषध प्रशासनाने केले आहे. आपल्याला हवा असलेल्या आंब्याला घाई गडबडीने घेताना तो कृत्रीमरित्यातर पिकवुन तर दिला जात नाहीना याची खबरदारी घेणे आवश्‍यक बनले आहे. सातारा मार्केट कमिटी येथे फळविक्रेते यांची कार्यशाळा अन्न व औषध प्रशासनाने आयोजित केली होती. या कार्यशाळेत अन्नसुरक्षा व मानद कायद्यांतर्गत कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करण्यास बंदी आहे याची जाणीव फळ विक्रेत्यांना करून देण्यात आली. तसेच फळे पिकवण्यासाठी अन्नसुरक्षा मानदे कायद्याची परवानगी असलेले असलेले.इथेजिंग एस पावडरचा वापर करावा याच्या सूचना देण्यात आल्या तसेच आगामी काळात फळबाजारात आंब्याची आवक वाढणार आहे.

फळे पिकविण्यासाठी इथिलिन वायू तसेच पावडर स्वरूपात फळाच्या प्रत्यक्षात संपर्क न आणता. त्यामध्ये इथेफोन पावडर वापरण्यास कायद्याने परवानगी देण्यात आलेली आहे. याची माहिती देण्यात आली व सर्व फळे विक्रेत्यांनी अन्नसुरक्षा व मानद कायद्यांतर्गत आवश्‍यक असलेल्या परवाना नोंदणी घेतल्याशिवाय व्यवसाय करू नये. तसेच परवाना व नोंदणी धारकांकडूनच फळे खरेदी-विक्री करावेत. आगामी काळात अन्न व औषध प्रशासनातर्फे फळे विक्री त्यांची तपासणी मोहीम घेण्यात येणार असून कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम रीत्या आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा देखील देण्यात आला आहे.

आता आंब्याचा हंगाम सुरू झालेला आहे. ग्राहकांनी चांगल्या दर्जाचा आंबा परवाना नोंदणी धारकांकडून खरेदी करावा. ग्राहकांनी आंबा खरेदी करताना कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंबा आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन साहाय्यक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांनी केले. कार्यशाळा सुरेश देशमुख सह आयुक्त पुणे विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकुमार कोडगिरे सहाय्यक आयुक्त अन्न विभाग, अन्न सुरक्षा अधिकारी रूपाली खापणे, अनिल पवार, राहुल खंडागळे यांनी घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.