ममता बॅनर्जी यांनी सांभाळून बोलावे अन्यथा…

भाजप आमदाराचा बॅनर्जी यांना चिदंबरम करण्याचा धमकीवजा इशारा

नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला ममता बॅनर्जी यांचा विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपच्या आमदाराने धमकीवजा इशारा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी सांभाळून बोलावे अन्यथा त्यांची अवस्था माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यासारखी करून टाकू, असा इशारा भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी दिला आहे. सिंह हे बैरियाचे आमदार आहेत. तसेच त्यांनी ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशचे पंतप्रधान व्हावे असा सल्ला दिला.

ममता बॅनर्जी यांनी जी वक्तव्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत केली आहेत त्यावरून त्यांना परकीय शक्तींचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे,असे सिंह यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांचे वाईट दिवस जवळ येत चालल्याचा विसर पडलेला दिसतो. त्यांनी भाषा व वर्तन बदलावे अन्यथा त्यांची गत तिहार तुरूंगात टाकण्यात आलेले माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्यासारखी करू असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला. 13 सप्टेंबरला ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात मोर्चा काढला होता, त्यानंतर त्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रम होऊ देणार नाही असे म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या याच वक्‍तव्याचा भाजप नेत्याने विरोध करत इशारा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.