ते पुढे म्हणाले, ‘गुरुवारी संध्याकाळी दक्षिण कोलकाता येथील कालीघाट येथे त्यांच्या राहत्या घरात त्या पडल्या. यावेळी त्यांच्या कपाळावर आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.’
सर्व तपासण्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
अधिकाऱ्याने शुक्रवारी सकाळी वृत्तसंस्थेला पीटीआयला सांगितले की, ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रकृती स्थिर आहे. त्यांना रात्री चांगली झोप लागली आणि रात्रभर वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्यावर बारीक नजर ठेवली.’
आज सकाळी त्यांची पुन्हा एकदा तपासणी केली गेली त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहे. बंगालच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कपाळावर तीन टाके आणि नाकाला एक टाके देण्यात आले आहे, रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.’
एसएसकेएम हॉस्पिटलचे संचालक मनिमॉय बंदोपाध्याय म्हणाले, “त्यांना मेंदूला, कपाळावर तसेच नाकाला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. सुरुवातीला आमच्या संस्थेतील न्यूरोसर्जरी, मेडिसिन आणि कार्डिओलॉजी विभागातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. यानंतर आता त्यांची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले.
‘ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर दोन आणि नाकाला एक असे तीन टाके लावण्यात आले. ईसीजी, इकोकार्डियोग्राम, सीटी-स्कॅन आणि डॉप्लरसारख्या महत्त्वाच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत.”
अद्याप तक्रार दाखल झालेली नाही
दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पोलिसांनी अद्याप मुख्यमंत्री पडण्यासंदर्भात कोणतीही तक्रार नोंदवली नाही. त्यांनी कालीघाट परिसरातील बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळ आणि आसपास सुरक्षा वाढवली आहे.’
सुरक्षा व्यवस्था तपासताना पोलीस म्हणाले,
‘आतापर्यंत, मुख्यमंत्री पडल्याबद्दल कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा वाढवली आहे’ असे पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. सुरक्षेत काही त्रुटी आहे का, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बॅनर्जींना Z+ श्रेणीची सुरक्षा मिळते आणि अधिकाऱ्यांची एक विशेष टीम ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेची आणि निवासस्थानाचीही काळजी घेते.