बामको, (माली) – मालीमध्ये झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण 7 सैनिक ठार झाले तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. मालीच्या पश्चिमेकडील भागात आणि मध्य मालीमध्ये हे दहशतवादी हल्ले झाले, असे मालीच्या सशस्त्र दलांच्या वेबसाईटने म्हटले आहे.
पश्चिम मालीमधील मौरदिया गावात शनिवारी दुपारी पहिला हल्ला झाला. या हल्ल्यात दोन सैनिक मारले गेले आणि दोघेजण जखमी झाले. त्यानंतर मध्य मालीमधील सेगाऊ गावात दुसरा हल्ला झाला. एका पिक अप व्हॅनला भुसुरुंगाद्वारे उडवून देण्यात आले.
या व्हॅनमध्ये पाचजण होते. ते सर्वजण या स्फोटात मारले गेले. या ठिकाणी घेण्यात आलेल्या शोधमोहिमेनंतर दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. याच महिन्यात 17 ऑक्टोबरला झालेल्या अशाच एका हल्ल्यात एक सैनिक आणि चार पर्यटक ठार झाले होते.