क्वालालंपूर – मलेशिया ओपन बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू एच. एस. प्रणोय याने अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला खेळाडू पी. व्ही. सिंधूला मात्र, उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
प्रणोयचा सामना इंडोनेशियाच्या क्रिस्तियन अदीनाटाशी झाला. मात्र, त्याने दुखापतीच्या कारणाने पहिल्याच गेममध्ये 19-17 असा पिछाडीवर असताना सामना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रणोयला पुढे चाल मिळाली व त्याने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली.
दुसरीकडे पहिल्या फेरीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या सिंधूला पराभवाचा धक्का बसला. जॉर्जियाची मानांकित खेळाडू मरिस्का तुंगजुंगकडून सिंधूचा 21-14, 21-17 असा सरळ दोन गेममध्ये पराभव झाला.