नवी दिल्ली :- सलग विजय मिळवत सध्या चांगाल्या फाॅर्मात असलेला अनुभवी एचएस प्रणॉय त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यावर असल्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक नक्कीच मिळवू शकतो, असे डेन्मार्कचे मुख्य प्रशिक्षक केनेथ जोनासेन यांचे मत आहे.
प्रणॉयचा २०२३ मध्ये एक अभूतपूर्व हंगाम होता. त्याने एशियन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिले कांस्य पदक जिंकले आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये उपविजेतेपदासह मलेशिया मास्टर्समध्ये त्याचे पहिले सुपर ५०० विजेतेपदही जिंकले आहे.
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर ऍक्सेलसनसारख्या खेळाडूंचे प्रशिक्षक जोनासेन यांनी म्हटले आहे की, प्रणॉयकडे अष्टपैलू खेळ आहे आणि तो मानसिकदृष्ट्या खंबीर आहे. गेल्या १२ महिन्यांपासून तो पुन्हा खूप आत्मविश्वासाने भरलेला आहे. तो एक चांगला आक्रमक आणि प्रसंगी उत्तम बचावपटू म्हणून खेळतो. तो मानसिकदृष्ट्या कोर्टवर खूप मजबूत असतो.