China Masters 2023 badminton tournament in Shenzhen – चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी गुरुवारी यशस्वी कामगिरी करत आगेकूच केली. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणोयने तर पुरुष दुहेरीत सात्विक साइराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने आपापल्या लढती जिंकत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
प्रणोयने डेन्मार्कच्या मॅग्नस जॉन्सनचा 21-12, 21-18 असा पराभव केला. हा सामना प्रणोयने केवळ 40 मिनिटांतच जिंकला. दुहेरीत सात्विक व चिराग जोडीने जपानच्या अकिरा कोगा व ताइची सेंटो या जोडीवर 21-15, 21-16 असा विजय मिळवला.
Koga/Saito 🇯🇵 face up to No.1 seeds Rankireddy/Shetty 🇮🇳.#BWFWorldTour #ChinaMasters2023 pic.twitter.com/ix2CKje6Ce
— BWF (@bwfmedia) November 23, 2023
दरम्यान, BWF सुपर 750 इव्हेंट चायना मास्टर्स 2023 मधील निकाल पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी खेळाडूंच्या पात्रता क्रमवारीत मोजले जातील. बॅडमिंटनसाठी पात्रता विंडो या वर्षी 1 मे रोजी सुरू झाली आणि एप्रिल 2024 मध्ये संपेल.