मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा कधी तिच्या फॅशनमुळे तर कधी अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. अनेकदा ती पार्टीसाठी जाताना स्पॉट होत असते. सध्या तिचा पार्टीमधील लुकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र तिने परिधान केलेल्या ड्रेसवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
मलायका अरोराचा सोशल मीडियावर एका पार्टीमध्ये जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाला कपड्यांमुळे व्यवस्थित चालता येणे देखील अवघड झाले आहे. मलायकाने पार्टीसाठी पांढऱ्या रंगाचा धोती स्कर्ट घातला होता. मात्र या ड्रेसमुळे ती नीट चालू शकत नव्हती. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘मलायकाला या कपड्यांमध्ये चालणे कठीण झाले आहे मग ही पार्टीमध्ये डान्स कसा करणार?’
याआधी देखील मलायका अनेकदा ट्रोल झाली आहे. मात्र याकडे ती दुर्लक्ष करताना दिसते. दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते. म्हणूनच सोशल मीडियावर अभिनेत्रीचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. अरबाज सोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन मागील काही वर्षांपासून डेट करत आहे. अनेकांना त्यांची जोडीही आवडते. मात्र अद्याप त्यांनी लग्न न केल्याने चाहते देखील त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.