नगर – केंद्र व राज्य सरकारने विविध विकास कामासाठी शहरामध्ये निधी प्राप्त करून दिलेला असून, ती कामे जलदगतीने व चांगल्या दर्जेची करून घेण्याचे काम मनपा अधिकारी व ठेकेदार यांनी करावी. आकाशवाणी ते भिस्तबाग चौक व महालापर्यतच्या रस्त्याच्या कामासाठी शासनाने सुमारे साडेतीन कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्याच्या कामावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे व नगरकरांसाठी मॉडेल रस्ता करावा. या रस्त्याच्या कामामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु टप्प्या टप्प्याने अनेक अडचणीवर मार्ग काढीत रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असून लवकरच हा रस्त्याचे काम मार्गी लागेल, असे प्रतिपादन संग्राम जगताप यांनी केले.
कुष्ठधाम रस्त्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली. यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, सभागृह नेते मनोज दुलम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, नगरसेवक स्वप्निल शिंदे, सागर बोरूडे, ज्येष्ठ नगरसेवक तायगा शिंदे, जयंत येलूलकर, अजिक्य बोरकर, बाळासाहेब पवार, निखील वारे, भाजप सावेडी मंडल अध्यक्ष सतिष शिंदे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखी, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे आदी उपस्थित होते.
यावेळी संपत बारस्कर म्हणाले, या रस्त्याच्या कामामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आ. जगताप यांनी या अडचणीवर मात करून रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. या रस्त्याच्या मध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाइन होत्या त्या स्थलांतरीत कराव्या लागल्या तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणे होती ती काढावी लागली. लाइटचे खांबही रस्त्याच्यामध्येभागी येत होते ते स्थलांतरीत करण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे उपनगराच्या विकासाला चालना मिळणार आहे, असे ते म्हणाले.