वाघोली येथील मॅजेस्टिक मॅनहॅटन प्रकल्पातील घरांचे मुदतीच्या १५ महिन्यांपूर्वीच हस्तांतरण
पुणे : आपल्या बांधकाम दर्जा आणि उत्तम सुविधांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील मॅजेस्टिक लँडमार्क या बांधकाम व्यावसायिक कंपनीने नुकतेच घर खरेदीदारांना सुखद अनुभव दिला आहे. कंपनीने शनिवारी ( दि.११) वाघोली येथील मॅजेस्टिक मॅनहॅटन या प्रकल्पातील २ ऱ्या फेज मधील घरांचे मुदतीच्या तब्बल १५ महिन्यांपूर्वीच हस्तांतरण केले.
मॅजेस्टिक लँडमार्क’तर्फे वाघोली येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आयोजित ‘होम पझेशन समारंभात सुमारे ६०० हून अधिक कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील घराच्या किल्लीचे हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार अशोक बापू पवार, निर्मलादेवी प्रतापराव सातव, रामभाऊ दाभाडे, संजय सातव पाटील, मीना संजय सातव पाटील, माणिकराव (दादा) सातव पाटील, महेंद्र भाडाळे, भरत (शेठ) तिवारी, वैशाली भरत तिवारी, मॅजेस्टिक लँडमार्क’ चे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी, संचालक अमित ललवाणी या मान्यवरांच्या हस्ते घराच्या किल्लीचे हस्तांतरण करण्यात आले.
याबाबत मॅजेस्टिक लँडमार्क’ चे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी म्हणाले,” पुण्यासारख्या शहरात आपले हक्काचे घर असावे, हे अनेकांचे स्वप्न असते. प्रत्येक जण आपल्या या स्वप्नच्या पूर्तीसाठी झटत असतो. त्यांच्या या प्रयत्नांची जाणिव ठेवत, नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घर लवकरात लवकर मिळावे, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने कामाच्या दर्जात अथवा प्रकल्पातील सोयी सुविधांमध्ये कोणतीही तडजोड न करता आम्ही मुदतपूर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. तो आज यशस्वी होत असल्याचे पाहून मनापासून आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांचा आनंद आणि विश्वास हे आमच्यासाठी नेहमीच सर्वाधिक महत्वाचे असते. त्यामध्ये यापुढेही वाढ होत राहो, हीच आमची अपेक्षा आहे.”
प्रकल्पाची वैशिष्ट्ये म्हणजे मॅजेस्टिक मॅनहॅटन हा एक गेटेड कम्युनिटी प्रकल्प आहे. पुणे – अहमदनगर हायवेपासून अगदी जवळ वाघोली येथे असलेल्या या प्रकल्पाचे भौगोलिक क्षेत्र हे कनेक्टिव्हिटी’च्या दृष्टीकोनातून अतिशय योग्य ठिकाणी आहे. इतकेच नव्हे तर अनेक व्यावसायिक अस्थापना या प्रकल्पापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. विविध ‘रेडी टू युझ ‘ सुविधांनी सज्ज असलेला हा प्रकल्प नागरिकांना राहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या प्रकल्पाचा पहिला फेज यापूर्वीच पूर्ण झाला असून, आता दुसरा फेज देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.