मुंबई – सोनम कपूर कधीही फॅन्सना सरप्राईज द्यायला कमी पडत नाही. ती नेहमीच सोशल मीडियावर आपल्या लाईफचे अप अँड डाउन शेअर करत असतात.
तिने आपल्या फॅन्सला सोशल मीडियाच्या माध्यमातून सरप्राईजदेत असते, आताही अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर तिच्या सोबत घडलेला वाईट प्रसंग शेअर करत आहे.
Hey guys I’ve had the scariest experience with @Uber london. Please please be careful. The best and safest is just to use the local public transportation or cabs. I’m super shaken.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 15, 2020
यातच, मागच्या काही दिवसांपासून सोनम कपूर वेगवेगळ्या देशात प्रवास करत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रवासादरम्यान सोनमचं सामान गहाळ झालं होतं. त्यानंतर आता लंडन शहरात प्रवास करत असताना सोनमसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे ती खूपच घाबरली आहे.
सोनमनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेची माहिती दिली. लंडनमध्ये उबर सर्व्हिस घेतल्यानंतरचा तिचा अनुभव किती भीतीदायक होता हे तिनं यावेळी या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. तिनं लिहिलं, ‘मी लंडनमध्ये प्रवास करत असताना उबर सर्व्हिस वापरली. त्यावेळीचा माझा अनुभव खूप भीतीदायक होता. तुम्ही तुमची काळजी घ्या. जेव्हा शक्य होईल तेव्हा लोकल कॅब किंवा सार्वजनिक वाहन सेवेचा वापर करा. माझ्यासोबत घडलेल्या या घटनेनं मला खूप मोठा धक्का बसला आहे.’ असं म्हणत तिने आपल्या फॅन्सला मोलाचा सल्ला दिला आहे.