Ganpat Gaikwad Firing : महाराष्ट्र भरडला जातोय. वर्दीचा मान ठेवणारे आपण लोक आहोत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हक्क मिळवून देतील. दिवसा ढवळ्या भांडणे होतात. आमदारांची हिम्मत कशी होते हे करण्याची? त्यांच्या पक्षाचा व्यक्ती आहे. फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उल्हासनगरमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकणारवर केली आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देतांना त्या पुढे म्हणाल्या,’भाजपचा आमदार आहे म्हणून काहीही करेल का?मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवावा, याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडाराज आहे, एवढी यांना सत्तेची मस्ती? गुंडराज नाही तर काय? असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केला आहे. महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली आहे.’ असेही त्या म्हणाल्या आहे.
तत्पूर्वी, हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर ठाणे जिल्हा हादरला आहे. उल्हासनगरसह कल्याणमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहे. मिळलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांचं निवासी परिसरात तसेच कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.