Mahesh Babu’s daughter becomes cyber crime victim । साऊथ स्टार अभिनेता महेश बाबू यांची मुलगी सितारा सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी जाहिरातीत दिसण्यासाठी सिताराला 1 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे सोशल मीडियावर सितारा नेहमीच डान्स व्हिडिओ शेअर करत असते.
अशात सितारा घट्टमनेनी सायबर गुन्ह्याची शिकार झाली असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सीताराची आई आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून दिली आहे.
View this post on Instagram
नम्रताने नोटीस जारी करून माहिती दिली की,’तिची लेक सितारा घट्टामनेनीच्या नावाने अनेक बनावट खाती सोशल मीडियावर तयार केले आहे. सुपरस्टार महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर यांनी इन्स्टाग्रामवर नोटीस जारी केली, फक्त @sitaraghattamaneni हेच तिची लेक सितारा घट्टमनेनीचे खरे खाते आहे. याशिवाय इतर कोणत्याही इन्स्टाग्राम हँडलवर विश्वास ठेवू नये.
या बनावट खात्याबाबत नम्रताने पोलिसात तक्रार केली आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि सुपरस्टार महेश बाबू यांची मुलगी सितारा घट्टमनेनी ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार बनली आहे.
सितारा घट्टामनेनी अवघ्या १२ वर्षांची आहे. सितारा घट्टामनेनी यांना सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर सुमारे 1.8 दशलक्ष लोक फॉलो करतात. सितारा घट्टमनेंना तिच्या वडिलांप्रमाणे मोठी स्टार व्हायचे आहे.
हेही वाचा
kareena kapoor khan। करीनाच्या लेकाला फुटबॉलपटू लियोनार्डो मेस्सीसारखा व्हायचे