Debina Banerjee : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देबिना बॅनर्जी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा ती लियाना आणि देवीशा या दोन मुलींचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतेच देबिनाने पती गुरमीत आणि मुलीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे.
देबिना बॅनर्जीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देबिना आणि गुरमीत हे त्यांच्या मुलीसोबत खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये देबिना आणि गुरमीत हे त्यांची मुलगी लियानाला हाताने गोल फिरवताना दिसत आहेत. देबिना आणि गुरमीत यांची मुलीला खेळवण्याची पद्धत नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही.
अशातच आता नेटकरी देबिना आणि गुरमीतला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं त्यांच्या व्हिडीओला कमेंट करत “मुलीला असं खेळवू नका, कदाचित तिला दुखापत होऊ शकते.” तर दुसऱ्या युझरने “बाळ म्हणजे काय खेळणे आहे का?’ असे म्हंटले आहे. सध्या देबीनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, यापूर्वी देखील देबिनाने मुलींसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात बॉम्बे फॅशन वीकमध्ये देबिनाने हजेरी लावली होती. यावेळी तिने मुलींसोबत रॅम्प वॉक केला. देबिनाचा पती गुरमीत चौधरीही कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होता. देबिनाचा रॅम्प वॉकदरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.
देबिना लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर 3 एप्रिल 2022 रोजी आई झाली. पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 7 महिन्यांत ती पुन्हा आई झाली होती. यावरूनही तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र तेव्हा तिने टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते.
हेही वाचा: