Entertainment : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता महेश बाबूने (Mahesh Babu) अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशभरात त्याचे लाखो चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर महेश बाबू आणि अनिल कपूरचा (Anil Kapoor) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अनिल कपूरने महेश बाबूचा अपमान केल्याचे म्हंटले जात आहे. त्यावरून आता महेश बाबूच्या चाहत्यांनी अनिल कपूरला ट्रोल केले आहे.
हैद्राबादमधील मल्ला रेड्डी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे ‘अॅनिमल’ चा प्री रिलीज इव्हेंटमध्ये महेश बाबूसोबत दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी स्टेजवर अनिल कपूर आणि बॉबी देओल उभे असल्याचे दिसते. तेव्हा अनिल कपूर स्टेजसमोर बसलेल्या महेश बाबूला हाक मारतो आणि म्हणतो, ‘तु मला नाही म्हणू शकत नाही. ही माझी ऑर्डर आहे. तू ये’ अनिल कपूरच्या या विनंतीवर महेश बाबू स्टेजवर पोहोचतो. अनिल कपूर नाचू लागतो आणि महेशलाही नाचायला सांगतो. पण महेश बाबू अनिल कपूरला मिठी मारतो आणि स्टेजवरून खाली जातो.
Embarassing moment for Mahesh Babu 😜#AnimalPreReleaseEvent
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) November 27, 2023
अनिल कपूरने महेश बाबूला दिलेल्या वागणुकीमुळे चाहते चांगलेच संतापले आहेत. अनिल कपूर आणि महेश बाबू यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, रणबीर कपूर आणि अनिल कपूर त्यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. या सिनेमात रणबीर आणि अनिल कपूरसह रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून येत्या 1 डिसेंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.