मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘रणवीर सिंग’ आणि साऊथचा सुपरस्टार ‘महेश बाबू’ लवकरच प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहे. मुंबईत एका नामांकित कंपनीच्या जाहिरातीसाठी हे दोघे एकत्र आले होते.
त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, हे फोटो व्हायरल होताच फोटोवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.
यामध्ये रणवीर आणि महेश बाबू यांनी काळ्या रंगाचे ड्रेस परिधान केले आहेत. दोघे या ड्रेसमध्ये खूपच स्मार्ट आणि डॅशिंग दिसतायेत.
सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच रणवीर सिंग आणि महेशबाबू एकत्र साजिद नाडियाडवाला यांचा चित्रपटात काम करणार आहे. त्यामुळे रणवीर आणि महेशबाबूला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर झाले आहेत.