महेंद्रसिंह धोनीला सुरक्षा पुरवण्याची गरज नाही-बिपीन रावत

England's captain Eoin Morgan poses with the World Cup trophy as England's players celebrate their win after the 2019 Cricket World Cup final between England and New Zealand at Lord's Cricket Ground in London on July 14, 2019. - England won the World Cup for the first time as they beat New Zealand in a Super Over after a nerve-shredding final ended in a tie at Lord's on Sunday. (Photo by Glyn KIRK / AFP) / RESTRICTED TO EDITORIAL USE

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याने भारतीय लष्करात आपल्या सेवा देण्यासाठी वेस्ट इंडीज दौऱ्यातून नुकतीच माघार घेतली. त्यानंतर तो जम्मू-काश्‍मिरच्या खोऱ्यात भारतीय लष्करासोबत प्रशिक्षण घेत आहे. त्यावरच आता भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मोठे विधान केले आहे. महेंद्रसिंह धोनी हा भारतीय लष्कराचा एक अविभाज्य घटक असून तो देशाचे संरक्षण करण्यासाठी सैन्यात दाखल झाला आहे त्यामुळे तो स्वत:चे संरक्षणदेखील स्वत: करू शकतो त्याला सुरक्षा पुरवण्याची गरज नसल्याचे रावत यांनी म्हटले आहे.

महेंद्रसिंह धोनी हा येत्या 31 जुलैपासून काश्‍मीरच्या खोऱ्यात जाऊन देशाच्या सीमेचे संरक्षण करणार आहे. त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरूच्या मुख्यालयात दाखल झाला आहे. दरम्यान, त्याच्या या निर्णयाचे स्वागत करत बिपीन रावत यांनी धोनी आता देशवासियांची सेवा करू शकतो आणि त्यासाठी त्याने योग्य ते प्रशिक्षण घेतले आहे. तसेच धोनी आता फक्‍त धोनी राहिला नाही तर तो आता 106 टेरिटॉरिअर आर्मी बटालियनचा सदस्य पॅरा झाला आहे. त्यामुळे तो इतरांचे संरक्षण करु शकतो तर त्याला इतर कोणत्या सुरक्षेची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)