लोणावळ्यात मुसळधार,एक्सप्रेस हायवेवरची वाहतूकही मंदावली

लोणावळा – लोणावळ्यात मुसळधार पाऊस पडत असून मागील २४ तासात ३७५ मिलिमीटर म्हणजे सुमारे १५ इंच पावसाची नोंद करण्यात आली असून यातील ३०० मिलिमीटर पाऊस हा केवळ मागील १५ तासांमध्ये कोसळला आहे. सतत पडत असलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल आणि रहिवासी भागात पाणी शिरले आहे.अनेक घरामध्ये पाणी भरले आहे.

पावसाच्या परिणाम वाहतूकीवर देखील झाला आहे. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहनचालकांना वाहन चालवणं जिकरीचे झाले आहे. नॅशनल हायवे ४ आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर देखील य पावसाचा परिणाम झाला असून वाहतूक मंदावली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटात मंकीहील जवळ काल मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळल्याने रेल्वेची वाहतूक प्रभावित झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.