नवी दिल्ली : संपूर्ण देशात मागच्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय नाट्याचीच चर्चा होती. अखेर येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवून या नाट्यावर पडदा टाकला. दरम्यान, शुक्रवारी बी.एस.येडीयुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा जन्मगाव असणाऱ्या मांड्यामधील बुकानेकरला भेट दिली.
आज सकाळीच ते आपल्या गावामध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माझ्या जन्मगावाला भेट देणे हे माझे कर्तव्य आहे कारण याच गावात माझा जन्म झाला आणि लहानाचा मोठादेखील मी इथेच झालो आहे त्यामुळे इथे येणे हे माझे कर्तव्य असल्याचे मी समजतो असे म्हटले. तसेच ते आज गावातील त्यांच्या घराला आणि गावाच्या मंदीराला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.