नगर -फुले यांनी “शिक्षण व समता’ या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. सर्वसामान्यांसाठी झटणारे ते जनसेवक होते. भारतीय समाजातील शूद्र, अतिशूद्र व स्त्रियांना गुलाम करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध जोतिबा फुले यांनी झुंज दिली. अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन भिंगार अर्बन बॅंकेचे अध्यक्ष अनिल झोडगे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंगार अर्बन बॅंकेच्यावतीने बॅंकेच्या आवारातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष किसन चौधरी, संचालक नाथाजी राऊत, नामदेव लंगोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे आदी उपस्थित होते.
याप्रसंगीचौधरी यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रसंग सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच बॅंकेच्यावतीने सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी एकनाथ जाधव, विजय भंडारी, अमोल धाडगे आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.