Hingoli News| हिंगोलीमधील वसमत तालुक्यातील मौजे गुंज येथील जवानाला सिक्कीममध्ये कर्तव्य बजावाना वीरमरण आले आहे. अंकुश एकनाथ वाहुळकर असे सैन्य दलातील जवानाचे नाव असून ते अवघ्या 24 वर्षांचे होते. सिक्कीममध्ये कर्तव्यावर असताना वाहनाचा अपघात झाला होता आणि यातच ते शाहिद झाले.
अंकुश वाहुळकर 2020 साली महार बटालियनमध्ये अंकुश हे रूजू झाले होते. त्यांनी आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे गुंज आसेगाव या गावी घेतले होते. माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सैन्य दलात जाण्याचा त्यांनी निर्णय केला होता आणि त्यांनी परभणी येथून भरती झाल्यानंतर सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते कर्तव्यावर रुजू झाले होते.
अंकुश वाहुळकर यांचे सिक्कीममध्ये कर्तव्य बजवताना अपघाती मृत्यू झाल्याची बातमी जिल्हा प्रशासनाने वाहुळकर यांच्या कुटुंबाला कळवली. या घटनेनंतर जवान अंकुश वाहुळकर यांच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.
वाहुळकर यांचा मृतदेह सिक्कीम येथून हैदराबादमध्ये आणण्यात येणार असून त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे जवानाचे मूळ गाव असलेल्या गुंज येथे भारतीय सैन्य दलातील अधिकारी घेऊन येणार आहेत. उद्या दुपारनंतर शासकीय इतमामात सैन्य दलातील जवान अंकुश वाहुळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते.
दरम्यान, अंकुश वाहुळकर हे पंधरा दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. त्यांच्या विवाहासाठी नातेवाईक प्रयत्न करत असताना अचानक वरिष्ठांचे कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश मिळाल्यानंतर ते पुन्हा रुजू झाले होते. अंकुश यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे. मात्र अंकुश शहिद झाल्याने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा:
“प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करा” ; कर्नाटक सरकारची परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी