वॉशिंग्टन । अमेरिकेत सध्या महाग फळे खाण्याचा ट्रेंड जोर पकडत आहे याचाच एक भाग म्हणून दक्षिण कॅलिफोर्नियातील एका स्टोअरमधून एका ग्राहकाने तब्बल ३९५ डॉलरला एका अननसाची खरेदी केली भारतीय रुपयांमध्ये या अननसाची किंमत सुमारे 35 हजार रुपयांच्या आसपास आहे रुबी ग्लो जातीचे हे अननस नेहमी अडीचशे ते तीनशे डॉलर पर्यंत विकले जाते पण या स्टोअरमधून ते तब्बल 395 डॉलरला विकले गेले.
डेल मॉन्ट ही अमेरिकेतील एग्रीकल्चर कंपनी दरवर्षी अशा महाग फळांचे उत्पादन करती आणि ही कंपनी अशा प्रकारच्या महाग अननसासाठी सुद्धा फेमस आहे सुमारे पंधरा वर्षाचे संशोधन करून या कंपनीने रुबी ग्लो हे अननस विकसित केले आहे आजपर्यंत हे अननस उत्पादनानंतर फक्त चीनमध्ये विक्रीसाठी पाठवले जात होते .
आता ते अमेरिकेतही उपलब्ध करण्यात आले आहे गेल्या काही कालावधीपासून अमेरिकेतील अनेकांना महाग फळांचे व्यसन लागले आहे वेगळ्या प्रकारे आणि महाग प्रक्रियेने विकसित करण्यात आलेली सफरचंदे स्ट्रॉबेरीज आणि संत्री अशा फळांना सध्या अमेरिकेत मागणी वाढत चालली आहे त्यात आता या अननसाचीही भर पडली आहे अमेरिकेत किराणा माल स्वस्त होत असताना या फळांचे दर मात्र सतत वाढत चालले आहेत अर्थात अमेरिकेतील स्टोअर्समध्ये सर्वसामान्य नागरिकांना खरेदी करता येतील अशी सर्व फळे योग्य किमतीमध्येही उपलब्ध आहेत