jagdeep dhankhar – काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी पंतप्रधान मोदींची महात्मा गांधींशी तुलना केल्याच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. टागोर म्हणाले की, ”तुम्ही महात्मा गांधीशी तुलना केली हे लाजिरवाणे आहे. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि तुम्ही ती मर्यादा ओलांडली आहे. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर अशी विधाने तुम्हाला शोभत नाहीत.” असं म्हणत टीका केली आहे.
If you compare with Mahatma it’s shameful Sir, we all know there is a limit to sycophancy now you have crossed that limit, and to be in your chair & position and to be a sycophant does not add value Sir. With respect @VPIndia https://t.co/CumvQwNbGN
— Manickam Tagore .B🇮🇳✋மாணிக்கம் தாகூர்.ப (@manickamtagore) November 27, 2023
तत्पूर्वी, एका कार्यक्रमात संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले होते की, ‘गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते, पण या शतकातील महापुरुष नरेंद्र मोदी आहेत. ते म्हणाले की, महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेऊन ठेवले आहे, ज्यावर आपण नेहमीच पाहू इच्छितो. जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यात धनखर बोलत होते.’
जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यात बोलताना धनखड म्हणाले, महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला ज्या मार्गावर जायचे होते त्या मार्गावर नेले. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महापुरुष होते. नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत.’ या वरून आता राजकीय वातावरण तापले आहे.