Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) विविध भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. विनोदी कार्यक्रमांसह तिने काम केले आहे. याशिवाय तिने काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ‘अवघाचि संसार’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘वादळवाट’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत ती दिसली होती. त्यानंतर आता लवकरच ती एका हिंदी मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील तिची भूमिका फारच खास असणार आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
हेमांगी कवी ‘कैसै मुझे तुम मिल गए’ या मालिकेत दिसणार आहे. तिने इंस्टाग्रामवर मालिकेतल्या तिच्या लूकचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘आजपासून येतेय तुमच्या भेटीला! एक नवी भूमिका घेऊन! भवानी चिटणीस म्हणून! रोज रात्री 10 वा; फक्त @zeetv आणि @zee5 वर. ‘कैसै मुझे तुम मिल गए’ मालिकेमध्ये! हिंदी मालिकेमध्ये मराठी पार्श्वभूमी असलेलं पात्र साकारताना अतिशय आनंद होत आहे. मालिकेच्या निर्मात्या @muktadhond मराठीच असल्यामुळे आपसुक एक आपलेपणा आणि तितकाच मोकळेपणा अनूभवायला मिळतोय.’
View this post on Instagram
पुढे तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘हाच आनंद तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आणि तुमचं १००% मनोरंजन करता यावं हे बळ आम्हांला मिळो हीच ईच्छा! आतापर्यंत जसं प्रेम, आशीर्वाद देत आलात यापुढेही देत रहा ही विनंती!,’ असे हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या मालिकेत हेमांगीची भवानी चिटणीसची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, हेमंगीने याआधी ‘तेरी लाडली मै’ या हिंदी मालिकेत दिसली होती. याशिवाय ती सुष्मिता सेनसोबत ताली या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. क्रिकेटर युवराज सिंह आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जाहिरातीत स्क्रीन शेअर केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली हेमांगी नेहमीच तिच्या कामाचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.