मुलांच्या गटात महाराष्ट्राला विजेतेपद

रांची: राष्ट्रीय मुले आणि मुलींच्या खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटाचे विजेतेपद ओडिशाला मिळाले.

या स्पर्धेत केलेल्या सर्वोत्कृष्ट खेळासाठी मुलांमध्ये उस्मानाबादच्या रमेश वसावेला भरत पारितोषिकाने, तर मुलींमध्ये ओडिशाच्या अनन्या प्रधानला इला पारितोषिकाने गौरवण्यात आले.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा 15-7 असा एक डाव 8 गुणांनी पराभव केला आणि विजेतेपद प्राप्त केले. महाराष्ट्राच्या गणेश बोरकर, अजय कश्‍यप, रमेश वसावे यांनी अत्यंत सरस कामगिरी केली. मुलींच्या अंतिम लढतीत ओडिशाने महाराष्ट्राचा 15-8 असा 7 गुणांनी पराभव करत विजेतेपद मिळविले.

Leave A Reply

Your email address will not be published.