गडचिरोली भ्याड हल्ला; राज्यपालांचे चहापान रद्द

मुंबई – आज ऐन महाराष्ट्रदिनी गडचिरोलीमध्ये नक्षलावाद्यांनी घडवून आणलेल्या भू-सुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले.आणि त्यानंतर राज्यावर शोककळा पसरली आणि या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

पोलिसांवर झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी संध्याकाळी राजभवन येथील चहापान व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे.

दरम्यान, राजज्यपालांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे मान्यवर निमंत्रितांसाठी तसेच विविध देशांच्या प्रतिंनिधींसाठी चहापान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.