नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना परदेशात जाण्याची परवानगी स्थानिक न्यायालयाने दिली आहे. शशी थरूर यांना 5 ते 20 मेपर्यंत अमेरिकेत जाण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे.
पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांच्यावर कलम 498-अ आणि 306 नुसार आरोप करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, शशी थरूर यांनी स्थानिक न्यायालयात अर्ज दाखल करून 5 ते 20 मेच्या दरम्यान अमेरिकेला जाण्याची परवानगी मागितली होती. यावेळी न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी शशी थरूर यांच्या अर्जावर दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवून उत्तरांची मागणी केली होती. पोलिसांच्या उत्तरानंतर कोर्टाने शशी थरूर यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.