Mahakal Temple Fire । मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भस्म आरतीदरम्यान महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आग लागली. यात १३ जण भाजल्याची माहिती समोर येतीय. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटना घडली त्यावेळी होळी साजरी सुरू होती. जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी याविषयी माहिती दिली. गर्भगृहात भस्म आरती दरम्यान आग लागली
या घटनेबाबत पुजारी आशिष शर्मा यांनी माहिती देताना, “महाकाल मंदिरात पारंपारिक होळी साजरी केली जात होती. गुलालामुळे गर्भगृहात आग पसरली, त्यामुळे मंदिरातील पुजारी होरपळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने मंदिरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
आरतीच्या वेळी गुलाल उधळल्याने आग Mahakal Temple Fire ।
भस्म आरतीच्या वेळी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात गुलाल ओतल्याने आग लागल्याचे सांगण्यात येतंय. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप आहे. होळीच्या दिवशी बाबा महाकालला रंग चढवले जातात. यावेळी चांदीच्या भिंतींना इजा होऊ नये म्हणून शिवलिंगावर प्लास्टिकचे फ्लेक्स लावण्यात आले. यावेळी गर्भगृहात पुजारी एकमेकांना रंग लावत असताना अचानक आरतीच्या ताटातील कापूर फ्लेक्सवर पडला आणि आग लागली. मात्र वेळीच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थितांनी आग नियंत्रणात आणली.
रविवारी फुलांची होळी खेळण्यात आली Mahakal Temple Fire ।
याआधी महाकाल मंदिरात संध्याकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी बाबा महाकालसोबत गुलालाची होळी खेळली होती. होलिका दहनही मंदिर परिसरातच करण्यात आले. रविवारी भस्म आरतीवेळी 51 क्विंटल फुलांची होळी खेळण्यात आली. ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.