नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. आता आणखी एका राजकीय नेत्याला करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना करोनाची लागण झाली आहे. महादेव जानकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
प्रचंड प्रवास व कार्यक्रम यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे करोना टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशनमध्ये राहणार आहे, याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तत्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना करोनाची लागण होताना दिसत आहे. आता महादेव जानकर यांनाही करोनाची लागण झाली आहे.
संपूर्ण जगासह देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही करोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल राज्यात तब्बल 44 हजार 388 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण करोनामुक्त झाले आहे.