पुणे- एसटीच्या वतीने शिवाजीनगर स्थानकातून दर रविवारी महाबळेश्वरसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहे. आजपासून या सेवेला प्रारंभ होत आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. पुण्यातून देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वरला जातात.
महाबळेश्वरला जाण्यासाठी नागरिक खासगी वाहनांबरोबरच एसटी महामंडळाच्या बसचा वापर करतात. हिवाळ्यात महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता एसटी विभागाच्या पुणे विभागाने विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजीनगर स्थानकातून दर रविवारी सकाळी सहा वाजून 30 मिनटांनी एसटी बस सुटणार आहे.
एसटीच्या निमआराम तिकीटाचे दर प्रत्येक व्यक्तीसाठी 600 रुपये असणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदूर्गसाठी या विशेष बस सोडण्यात येणार आहेत. दर रविवारी या बस स्वारगेट आणि शिवाजी नगर एसटी स्थानकातून सोडण्यात येणार आहेत, असे वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे यांनी सांगितले.