पुण्यातील लेखालिपिक महिलेकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी;गुन्हा दाखल

पुणे  – पतीविरुद्ध दाखल प्रकरण मागे घेण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालायत लेखालिपिक महिलेकडे 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैशांची व्यवस्था केली नाही, तर पतीप्रमाणेच मुलांनादेखील केसमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत 47 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन जाधव आणि एका महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

फिर्यादी महिलेचे पती सातारा जिल्ह्यात एसटी महामंडळ डेपो मॅनेजर आहेत. त्यांच्याविरुद्ध औरंगाबाद येथील वाहक महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आला. त्याने स्वतःचे नाव सचिन जाधव सांगितले. तो औरंगाबादहून आला असून, तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचे नाव सांगून संबंधित महिला केस मागे घेण्यास तयार असल्याचे म्हटले.

 

मात्र, त्यासाठी दोन दिवसांत 50 लाखांची व्यवस्था करा. त्यावेळी फिर्यादी महिलेने म्हटले की, तिने माझ्या नवऱ्याला खोट्या आरोपामध्ये अडकविले आहे. मग आता कशाचे 50 लाख? यावर त्याने पैसे नाही दिले, तर नवऱ्याला जसे गुन्ह्यात अडकवले तसेच मुलांनादेखील अडकवण्याची धमकी दिली आहे. “तडजोड करायची असेल, तर 50 लाखांची तयारी ठेवा असे म्हणून जात असताना, पोलिसांत गेलात तर जिवे ठार मारेल’ अशी धमकी फिर्यादींना दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.