मुंबई – सध्या सोशलवर मराठी वेब सीरिज रानबाजार चांगलीच चर्चेत आली आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सोशलवर रानबाजार वेब सीरिजच्या ट्रेलर आणि पोस्टर नुकतच शेअर केले. या टीझरमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या सुपरबोल्ड अंदाजाबरोबरच अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवारच्या लूकची तेवढीच चर्चा रंगली आहे.
याच बरोबर माधुरी पवारने नुकतेच ‘आणा मला जरतारी साडी, साडीसंगे आणा लाल मोठी गाडी’ या धमाल गाण्यावर ठेका धरला आहे. हे गाणे सध्या सोशलवर चांगलेच चर्चेतले आहे. सप्तसूर म्युझिकने हे गाणे लॉन्च केले आहे. हा व्हिडीओ नुकताच सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे.
सप्तसूर म्युझिकनं आतापर्यंत लोकगीत म्युझिक व्हिडिओ सादर केले आहेत. त्यात आता लाल मोठी गाडी या लावणी म्युझिक व्हिडिओची भर पडत आहे. “लाल मोठी गाडी”!! साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष निर्मित असून प्रेक्षकांचा या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अंकित शिंदे आणि दिव्या घाग ह्यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे.