मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने माधुरीने नुकतेच कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. नववर्षानिमित्त अभिनेत्रीने संपूर्ण कुटुंबासह गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. या वेळेसचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माधुरीचा ‘पंचक’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
माधुरी दीक्षितसोबत तिचे पती श्रीराम नेने आणि दोन्ही मुलेही एकत्र दिसली. अभिनेत्रीने पती आणि मुलांसह सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. यावेळी माधुरी प्रिंटेड सूटमध्ये दिसली. तिने काळा गॉगल देखील लावला होता. तर डॉ.नेने मरून रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसले. माधुरीचा हा साधेपणा चाहत्यांना देखील चांगलाच आवडला आहे.
माधुरी दीक्षित संपूर्ण कुटुंबासह गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आली होती. धक धक गर्लनेही या काळात चाहत्यांसोबत भरपूर पोज दिल्या. ती चाहत्यांमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करताना दिसली. यावेळेसचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी चाहत्यांसोबत छायाचित्रांसाठी पोझ दिली. यानंतर त्यांनी हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. बाप्पाच्या दर्शनानंतर दोघेही सिद्धिविनायक मंदिराबाहेर दिसले. या कपलचे हे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहेत.’पंचक’ बद्दल बोलायचे तर माधुरी दीक्षितने नुकतेच पती श्रीराम नेने यांच्यासोबत निर्माता म्हणून झळकणार आहे. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘पंचक’ 5 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.