Madhuri Dixit And Shriram Nene| अभिनेत्री माधुरी दीक्षितने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. माधुरी दीक्षितसह तिचे पती डॉ. श्रीराम नेने सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’चा माधुरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पती नेनेसोबत एक लोकप्रिय इंग्रजी गाणे गाताना दिसत आहे.
डॉ. नेनेंनी आता त्यांच्या एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते दोघेही एड शीरनचं लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहेत. डॉ. नेनेंनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित एड शीरनचे सर्वात लोकप्रिय गाणे गात आहे. व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसत आहे. Madhuri Dixit And Shriram Nene|
View this post on Instagram
काही वेळातच अभिनेत्रीचे पती नेनेही आपल्या पत्नीसोबत गाणे गाताना दिसत आहेत. हे कपल नेहमीप्रमाणे स्टायलिश दिसत होते. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, ‘आमच्या आवडत्या गाण्यांपैकी एक ‘परफेक्ट’ गाताना नेहमी खूप मजा येते’ असं कॅप्शन डॉ. नेनेंनी या व्हिडीओला दिलं आहे. याचबरोबर त्यांनी एड शीरनला टॅगही केलं आहे. Madhuri Dixit And Shriram Nene|
सध्या माधुरीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. दरम्यान, माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांनी मराठी सिनेमा ‘पंचक’ ची निर्मिती केली होती. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा: