Entertainment : अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अभिनेता संजय दत्त (Sanjay datt) यांचा 1993 साली आलेला ‘खलनायक’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या सिनेमामुळे त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली आहे. नुकतेच चित्रपट निर्माते सुभाष घई आणि त्यांची पत्नी मुक्ता घई यांच्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षित, संजय दत्त, जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांनी हजेरी लावली होती.
या पार्टीत माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे देखील उपस्थित होते. माधुरी आणि श्रीराम नेने यांनी नुकतेच या डिनर पार्टीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रीराम नेने यांनी हे फोटो शेअर करत लिहिले,’अशा लोकांमुळेच वेळ सुंदर जातो.’ मात्र या व्हायरल फोटोनंतर खलनायक 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगली आहे. खलनायक या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या चित्रपटामधील ‘चोली के पीछे क्या है’, ‘नायक नहीं खाल नायक हूं मैं’ ही गाणी सुपरहिट ठरली. आजही गाणी लोकप्रिय ठरत आहे.
View this post on Instagram
आता सुभाष घई आणि मुक्ता घई यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही टीम पुन्हा एकत्र आल्याने ‘खलनायक2 चित्रपट रिलीज होणार का?’ असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मात्र अद्याप या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. परंतु तब्बल 30 वर्षांनंतर खलनायक 2 पाहण्यास चाहते देखील उत्सूक असल्याचे या फोटोनंतर समोर येत आहे.