वाघोली – शिवसेनेच्या पुणे जिल्हा युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी वाघोली (ता. हवेली) येथील मच्छिंद्र सातव यांची फेरनिवड झाली असून फेरनिवडी बद्दल वाघोली आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाघोली ग्रामस्थ व महाविकास आघाडी पदाधिकार्यांच्या वतीने निवडीबद्दल मच्छिंद्र सातव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ दाभाडे, शिवसेनेचे नेते संजय सातव पाटील, माजी उपसरपंच मारुती गाडे, गणेश गोगावले, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, सुनील जाधवराव, पिंटू कटके, आदी मान्यवर उपस्थित होते.