सोलापूर – सोलापुरातील ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तान असा मजकूर लिहिलेल्या फुग्यांची विक्री करत होता. यादरम्यान या फुगांकडे काही मुस्लीम बांधवांचे लक्ष गेले त्यांनी याची दाखल घेत पोलिसांच्या ताब्यात लव्ह पाकिस्थानचे फुगे विकणाऱ्यास दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, ईद निमित्त अनेक मुस्लिम बांधव आपल्या मुलांना घेऊन नमाज पठणासाठी ईदगाह मैदानात आले होते. अशात तेथे उपस्थित विकणाऱ्यांकडून मुस्लीम बांधव मुलांसाठी फुगे विकत घेतात. अशात आज सकाळी नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लीम बांधवांचे लक्ष एका फुगेवाल्याकडे गेले.
या फुगेवाल्याकडील फुग्यांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. हे ज्या क्षणी जागरूक मुस्लीम बांधवांच्या लक्षात आले त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेत फुगेवाल्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या संदर्भात अजय पवार या फुगेवाल्याची चौकशी करत आहे.