मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल दोन दशकांनी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मी मुळचा पाकिस्तानी वंशाचा असल्याने पाकिस्तानमध्ये सरस कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा याने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ येत्या मार्च महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार असून या दौऱ्यात तीन कसोटी व 4 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी सामने रावळपींडी, कराची व लाहोरला होणार असून एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने रावळपींडीला होणार आहेत.