लिस्बन – पोर्तुगाल स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानेमैदानाबाहेर एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर तब्बल 40 कोटी फॉलोअर्सचा विक्रमी पल्ला गाठला आहे. हा पल्ला गाठणारा रोनाल्डो जगातील पहिलाच फुटबॉलपटूच नव्हे तर फॅन फॉलोइंग असलेला जगातील एकमेव व्यक्ती ठरला आहे.
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींमध्ये रोनाल्डोनंतर केली जेन्नरचा क्रमांक आहे. अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल असलेल्या जेन्नेरचे इन्स्टाग्रामवर जवळपास 31कोटी फॉलोअर्स आहेत.
अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे 30 कोटी 60 लाख फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोने लोकप्रीयतेच्या बाबतीतही मेस्सीला मागे टाकले आहे.