उत्तर प्रदेशात मद्यासह मोठा शस्त्रसाठा जप्त

बुलंदशहर -लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.

पोलिसांनी बुलंदशहर येथून मोठया प्रमाणावर दारू आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात 405 अवैध हत्यारे, 739 काट्रिज, 2 कोटी रुपयांचे मद्य आणि दीड कोटींची रोकड आहे. निवडणुकांच्या काळात मोठा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने हा शस्त्रसाठा जमा करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यानंतर पोलिसानी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.