संघासाठी कुठल्याही क्रमांकावर उतरणार – लोकेश राहुल

नवी दिल्ली – गेल्या अनेक सामन्यात अपयश आले असतानाही विश्‍वचषक स्पर्धेत अनपेक्षितपणे निवडल्या गेलेल्या लोकेश राहुलने तो संघासाठी गरजेनुसार कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीस उतरण्यास तयार असल्याचे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना विश्‍वचषक संघात राखीव सलामीवीर म्हणुन निवड झाल्यानंतर कुठल्या क्रमांकावर फलंदाजीस उतरणार असा प्रश्‍न विचारला असता लोकेश राहुलने त्या बद्दल आपण आता काहीच बोलु शकत नाहीत असे म्हणतानाच संघाच्या गरजे नुसार आपण कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज असल्याचे सांगताणाच आपण शक्‍यतो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरण्याची शक्‍यता असल्याचा हलकासा इशाराही त्याने यावेळी दिला.

यावेळी तो पुढे बोलताना म्हणाला की, माझी विश्‍वचषकासाठीच्या संघात निवड झाली असुन संघाची गरज असेल त्या ठिकाणी मला फलंदाजी करावी लागेल. जर मला परिस्थीती नुसार सलामीला ययला सांगितले तर मी सलामीलाही येइल, जर चौथ्या क्रमांकावर जायला सांगितले तर मी त्या क्रमांकावरही उतरेल. अखेर सामन्यतील परिस्थीती आणि सामन्याची गरज या नुसार माझी संघातील निवड आणि स्थान ठरवेल, असेही त्याने यावेळी नमूद केले.

विश्‍वचषक संघात निवड होण्यापुर्वी लोकेश राहुल लयीत नव्हता तो सातत्याने खराब प्रदर्शन करत असल्याने त्याचे संघातील स्थानाला धोका निर्माण झाला होता. याचा प्रत्यय वर्षाच्या सुरूवातीस ऑस्ट्रेलिया येथील कसोटी मालिके दरम्यान आला होता. यावेळी केवळ खराब प्रदर्शना मुळेच नव्हे तर एका कार्यक्रमादरम्यान त्याने हार्दिक पांड्याने केलेल्या अक्षेपार्ह विधानामुळे त्याला काही काळ संघा बाहेर ही रहावे लागले होते. त्यामुळे तो विश्‍वचषक स्पर्धा खेळु शकणार नाही अशी परिस्थीती निर्माण झाली असतानाच कसोटी मालिकेतील खराब कामगिरी नंतरही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली होती.

या मालिकेतील पहिल्याच सामन्यात 50 आणि दुसऱ्या सामन्यात 47 धावांच्या महत्वपूर्ण खेळी करत त्याने सर्वांना आपण फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवुन दिले. त्याच बरोबर स्थानीक क्रिकेट सामन्यांमध्ये आणि आयपीलच्या मोसमात चमकदार करत त्याने संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला आपली दखल घायला भाग पाडले होते. यामुळे त्याने विश्‍वचसक स्पर्धेसाठीच्या संघातील आपले स्थान जवळपास पक्‍के केले.

यावेळी विश्‍वचषकासाठीच्या संघात राहुलची निवड झाल्यनंतर त्याच्या फलंदाजी क्रमा बाबत चर्चा सुरू असतानाच अनपेक्षितपणे निवडण्यात आलेल्या विजय शंकरच्या बाबतीतही हीच चर्चा सुरू असुन आजी-माजी भारतीय खेळाडूंच्या मते राहुल चौथ्या क्रमांकासाठी योग्य उमेदवार असुन निवड समितीच्या मते या क्रमांकावर विजय शंकर जास्त उपयुक्त ठरेल त्यामुळे या क्रमांकावर कोण खेळणार याचे कोडे अद्याप सुटलेले नसले तरी दोन्ही खेळाडूंच्या मते सामन्याची परिस्थीती आणि वेळच कोण कधी आणि कोणत्या क्रमांकावर खेळेल हे निश्‍चीत होईल.

यावेळी लोकेश राहुलने सांगितले की, वर्साच्या सुरूवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात माझ्याकडुन झालेल्या खराब कामगिरी मुळे मी थोडा दबावात होतो. कारण कोणत्याही खेळाडूला लयीत नसणे ही संकल्पना वेदनादायी ठरत असते तसाच काहिसा प्रकार माझ्या बाबतीत ही घडत होता. यावेळी खराब कामगिरीमुळे संघातून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना संघचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समोर मी माझी समस्या मांडली असता त्यांनी मला माझ्या टेक्‍निकमध्ये बदल करायला सांगत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे माझ्या फलंदाजीतील उणिवा बाजुला सारण्यात मला फायदा झाला, त्याचा फायदा मला आयपीएलस्पर्धेतील सामन्यांमध्ये झाला.

तसेच लागोपाठ 2 महिणे टी-20 क्रिकेट खेळल्यानंतर एकदिवसीय क्रिकेट खेळण्यात जास्त अदचणी येणार नसुन केवल खेळण्याची पद्धत आणि परिस्थीती बदलेल असे सांगताना तुम्ही जितक्‍या लवकर स्वताःला त्या परिस्थीतीशी जुळवुन घ्याल तेवढ्या लवकर तुम्ही चांगला खेळ कराल असेही तो यावेळी म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.