नवी दिल्ली : लोकसभेचा कर्मचारी करोना बाधीत झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे तीन हजार कर्मचारी असणाऱ्या लोकसभेत हा पहिलाच कर्मचारी करोनाग्रस्त आढळला आहे.
हा कर्मचारी प्रत्यक्ष लोकसभेच्या आवारात कार्यरत नव्हता. तो 36 जीआरजी येथील लोकसभा सचिवालयाच्या इमारतीत कार्यरत होता. 23 मार्चला लोकसभा अधिवेशन संपल्यानंतर तो घरीच होता, असे सांगण्यात आले. दहा दिवसांपूर्वी त्याला खोकला, ताप आणि अंगदुखीची लक्षणे दिसू लागली. तो 18 एप्रिलला तपासणीसाठी गेला. त्याचा 20 एप्रिलला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.